तिचे मातीचे पाय आम्हालाही जमिनीवरच राहण्यास उद्युक्त करतात!
मुलांकडून शिकण्यासारखं काही असेल तर ते म्हणजे निस्वार्थी प्रेम कसं करावं हे. आई आपल्याजवळ नसेल तरी तिची काळजी करत राहणं, तिच्यावर प्रेम करत राहणं हे गुण या राही-रिशानेच शिकवले आहेत. राहीच्या बरोबरीच्या इतर मुलींपेक्षा तिच्यात भरपूर प्रगल्भता आहे. तिला काही सांगायला अगर शिकवायला जावं लागत नाही.......